रसवंतीगृहांवर नागरिकांची गर्दी वाढली… मागील तीन दिवस तापमानाचा पारा ३८ अंशावर…

0
115

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-

कोकणात हवामान वाढ सुरु झाली आहे. उष्ण हवामानामुळे रायगडसह कोकणवासिय हवालदिल झाले आहेत. मागील तीन दिवस तापमानाचा पारा ३८ अंशावर नोंदला जात होता. वाढलेल्या उष्म्यामुळे आता जीव कासावीस होत आहे. त्यामुळे रसवंतीगृह, सरबताच्या गाड्यांवर नागरिकांची गर्दी वाढत आहे. लिंबू, कोकम, मोसंबी, अननस, कलिंगड, कालाखट्टा या सरबताच्या स्वादांनी मागणी वाढली आहे.