अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
क्षत्रिय माळी समाज अलिबाग-रायगड यांच्यावतीने “क्षत्रिय माळी समाज प्रीमियर लीग २०२५” ही क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २८ फेब्रुवारी ते २ मार्च २०२५ या कालावधीत कुर्ला येथील आजाद मैदानावर होणार आहे.या स्पर्धेच्या माध्यमातून समाजातील बांधवांना एकत्र आणण्याचा आणि क्रिकेटप्रेमींना खेळण्याची संधी देण्याचा उद्देश आहे. या सामन्यांचे नियोजन आर.सी. क्लबच्या नियमानुसार केले जाणार आहे, त्यामुळे खेळाडूंना उत्तम अनुभव मिळेल.स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अनेक समाजबांधव मेहनत घेत आहेत. युवकांमध्ये एकता वाढवण्यासाठी आणि क्रीडाक्षेत्रात पुढे जाण्यासाठी हा एक उत्तम प्रयत्न आहे.संघटन समितीने सर्व समाजबांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले आहे. “एक पालक समाज उत्कर्षासाठी…!” या घोषवाक्याखाली समाजाच्या प्रगतीसाठी एकत्र येण्याचा संदेश दिला जात आहे.