अनधिकृत बांधकामांवरील रॅपिड ॲक्शनमुळे रूपाली मानेंचे स्थानिकांत कौतुक ….

0
23

पनवेल शिवसत्ता टाइम्स (जितीन शेट्टी) :-

पनवेल महानगरपालिकेच्या तक्का येथील गटारावरील दोन अनधिकृत मटण दुकानांवर ‘ड’ प्रभाग सहाय्यक आयुक्त रूपाली माने यांनी धडक कारवाई करत ही दोन्ही दुकाने बुलडोझरने जमीनदोस्त केली… रूपाली मानेच्या या कारवाईने अनधिकृत बांधकामांच्या मालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे… उघड्यावर मटण विक्री होत असल्याने परिसर दुर्गंधीयुक्त होत असे… यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला होता…

युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे पनवेल तालुका आघाडी अध्यक्ष जितीन शेट्टी यांनी याची तक्रार महापालिकेकडे केल्यानंतर प्रभाग अधिकारी रूपाली माने यांनी त्वरित कारवाई केली… रूपाली मानेंनी जराही वेळ न दवडता थेट बुलडोझर चालवून अनधिकृत बांधकामे भुई सपाट केली… त्यांच्या या धडक कारवाईमुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना चांगला धडा मिळाला आहे… या कारवाईत प्रभाग अधिक्षक रोशन माळी आणि अतिक्रमण विभागाचे कर्मचारी सहभागी होते… रूपाली मानेंनी घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे…. या कारवाईनंतर नागरिकांनी रूपाली मानेंच्या कामाचे भरभरून कौतुक केले… जितीन शेट्टी यांनी भविष्यातही अशाच प्रकारची कारवाई करण्याची मागणी केली आहे… यापुढे अनधिकृत बांधकामांवर असाच बुल्डोझर फिरवतील, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे… रूपाली मानेंच्या या धडक कारवाईमुळे पनवेल मधील अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे…