रायगडात शिक्षक संघटना उतरल्या रस्त्यावर… जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन…

0
29

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-

नवीन शिक्षक संच धोरणा विरोधात राज्यभरातील शिक्षक संघटना आता आक्रमक होत रस्त्यावर उतरायला सुरुवात झाली आहे…. आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं…. शासनाने आणलेले नवीन शिक्षक संच धोरण ग्रामीण, गोर गरीब मुलांच्या शिक्षण हक्कांवर गदा आणणारे आहे…. या धोरणाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शाळा बंद करून शिक्षणाचे खाजगीकरण करण्याचा हा डाव असल्याचा आरोप संघटनेने केला आहे… या धोरणामुळे हजारो शिक्षकांच्या नोकऱ्यांवर गदा येणार आहे…. त्यामुळे हे धोरण तातडीनं रद्द करावं अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला….