उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):-
उरण तालुक्यातील राजकीय गटात खळबळ माजवून देणारी घटना समोर येत आहे… तालुक्यात शेतकरी कामगार पक्ष नामधारी उरला असताना आता फुटीच्या उंबरठ्यावर येवून पोहचला… त्यामुळे येणाऱ्या काळात उरण तालुक्यात शेकाप शिल्लक राहील की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे…
उरण तालुक्यातील पागोटे येथे दिवस-रात्र कॉंग्रेस चषक क्रिकेट सामन्याचे आयोजन केले होते. सदर कॉंग्रेस चषक क्रिकेट सामन्याचे उद्घाटन शुक्रवार दिनांक २१ मार्च २०२५ रोजी रायगड कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सदर क्रिकेट सामन्याचा उद्घाटन प्रंसगी महेंद्रशेठ घरत यांनी मोठे वक्तव्य केले आहे…येत्या दोन ते तीन दिवसात प्रितम म्हात्रे यांची शिट्टी महेश बालदीत जाऊन भाजपात प्रवेश करणार आहे…रायगड कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष यांचा सदर व्हीडीओ समाज माध्यमांतून व्हारयल झाल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यक्रते सैरभैर झाले आहेत…मागील विधानसभा निवडणूकीत उरण तालुक्यातील शेकापला उभारी देण्याचे काम प्रितम म्हात्रे यांनी केले होते…उरण विधानसभा निवडणुक २०२४ मध्ये प्रितम म्हात्रे यांचा निसटता पराभव झाला होता…सदर व्हायरल व्हीडीओवर प्रितम म्हात्रे यांनी कोणत्याच प्रकारचा खुलासा न केल्याने उरण तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला खिंडार पडणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे…