माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-
खांदाड येते आयोजित होळी सणाचे पूजा दरम्यान सध्या देश भर गाजत असलेल्या “छावा” चित्रपट पडद्यावर रात्री दहा चा सुमारास सोनभैरव मंदिराचा भव्य प्रांगनात दाखविण्यात आला. सदर चित्रपट येतील चे नामांकित ‘नवयुवक मित्र मंडळ, खांदाड ‘ चे अध्यक्ष राहुल दसवते व पदाधिकारी यांच्या पुढाकाराने आयोजन केले गेले होते. तत्पूर्वी सालाबाद प्रमाणे होळी सणाचे पाचवा दिवस रंगपंचमी सण संपन्न होताच त्याचा दुसरा दिवस होळी ची पूजा ग्रामस्थ तर्फे ठेवले जाते सोबत भक्त जणांना महाप्रसादाची सोय करण्यात आला होता. दरम्यान यंदा प्रथमच संस्कृती कार्यक्रम न ठेवता आगळा वेगळा उपक्रम जसे मोठा स्क्रीन वर “छावा” सिनेमा दाखवण्यात आला होता.
यादरम्यान सदर उपक्रमास माजी लोकप्रिय नगराध्यक्ष तथा येथील वॉर्ड क्र. 16 चे नगरसेवक ज्ञानदेव पोवार, सोनभैरव मंदिराचे अध्यक्ष तत्कालीन माजी ग्रामपंचायत सदस्य काशीराम पोवार, पदाधिकारी, नवयुवक मित्र मंडळ चे पदाधिकारी, ग्रामस्थ व महिला मंडळ आणि युवक मोठया संख्येने उपस्थित होते. दरम्यान ही चित्रपट मोफत दाखविण्यात आला. हा चिटपट पाहण्यास आलोट गर्दी जमल्याचे या वेळी पाहायला मिळाले. दरम्यान बाळा पोवार यांनी सदर चित्रपट दाखविनया करीता एलईडी स्क्रीन, लाईट, साऊंड सिस्टीम ची सोय उपलब्ध करुन द्यावी म्हणून जबाबदारी दिले असता त्यानी अतिशय दर्जेदार व्यवस्था केल्याने कौतुकाचे वर्षाव होत आहे. या दरम्यान साऊंड सिस्टीम अप्रतिम होती. प्रेक्षक यांना ओपन थिएटर मध्ये जणू थेटर फीलिंग चे अनुभव पाहायला सारखेच मिळालयाचे मत व्यक्त करुन बाळा पोवार यांचे खास स्तुती केले तसेच पडदेवर किंबहुना प्रोजेक्टर वर न दाखवता डिजिटल स्क्रीन मध्ये प्रदर्शित करण्यात आल्याने सर्वांनी अतिशय आनंद लुटले. सुमारे 400 हुन अधीक लोक छावा सिनेमा पाहिल्याचे वार्तालाप करताना बाळा पोवार यांनी अंती सांगितले.