जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांचा भव्य पादुका दर्शन सोहळा… महाराजांच्या पादुका दर्शन सोहळ्याने रोहा शहर भक्तिमय…

0
36

रोहा शिवसत्ता टाइम्स (समीर बामुगडे):-

जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांच्या पादुका दर्शन सोहळ्याने रोहा शहर भक्तिमय झाले…अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज, जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिण पीठ, नानिजधाम (महाराष्ट्र) यांच्या रोहा येथील पादुका दर्शन सोहळ्याला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला…या सोहळ्याची सुरुवात जगद्गुरू श्रींच्या सिद्ध पादुकांसमवेत भव्य शोभा यात्रेने झाली. शिवसृष्टी मैदान -रायगड पार्क-रोहा नगरपरिषद ते गौळवाडी मैदान या मार्गावरून निघालेल्या या शोभा यात्रेत कलशधारी महिला, निशाणधारी, छत्रपती संभाजी महाराज, ढोल-ताशा पथक, लेझीम, धर्मक्षेत्र देखावा, मरणोत्तर देहदान देखावा, झेंडेधारी,रक्तदान महायज्ञ असे विविध कलापथक सहभागी झाले होते…या पादुका दर्शन सोहळ्याप्रसंगी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जगद्गुरू श्रींच्या पादुकांचे आगमन, आरती, सामाजिक उपक्रम, गुरुपूजन, प्रवचन,उपासक दीक्षा दर्शन, पुष्पवृष्टी यांसारखे अनेक कार्यक्रम या सोहळ्यात पार पडले.

या सोहळ्याचे औचित्य साधून दुर्बल घटक पुनर्वसन अंतर्गत गरीब आणि गरजूंना ४०० ब्लँकेट किटचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आणि जिल्हा सेवा समिती उत्तर रायगडच्या वतीने वाटप करण्यात आले.या सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष लालताशेठ कुशवाह,सुरेश सेठ मगर ओबीसी जिल्हा अध्यक्ष, अनंत थिटे ओबीसी रोहा तालुका अध्यक्ष, मोरेश्वर खरीवले तंटामुक्ती अध्यक्ष भातसई ग्रुप ग्रामपंचायत, विकास खांडेकर कुणबी अध्यक्ष रोहा तालुका, दिनेश मोरे माजी सरपंच रोट खुर्द, ह.भ.प नंदू महाराज तेलंगे,अशोक घावटे सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार राकेश खराडे जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,उदय रणभरे मुख्यपीठ,संजीवन ट्रस्ट प्रमुख,गणेश मोरे सहाय्यक पीठ प्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते…

जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांचा महाराष्ट्रात मोठा भक्तवर्ग असून त्यांच्या हितचिंतकांची संख्याही मोठी आहे…त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात अनेक सामाजिक उपक्रम सुरू आहेत. नुकत्याच ४ जानेवारी ते १९ जानेवारी २०२५ या अवघ्या १६ दिवसांमध्ये महाराष्ट्रसह इतर ६ राज्यांमध्ये पार पडलेल्या १२३१ महा रक्तदान शिबिरातून महाराष्ट्र शासन आणि इतर राज्यांच्या रक्तपेढ्यांना १३६२७० रक्त कुपिकांचे रक्तदान करण्यात आले.जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाचा मरणोत्तर देहदान हा उपक्रम जनमानसात प्रभावी ठरत आहे. सप्टेंबर २०१६ ते २३ मार्च २०२५ या कालावधीत ८९ मरणोत्तर देह समाजाच्या सेवेसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना सुपूर्द करण्यात आले. ब्लड इन नीड या उपक्रमाच्या माध्यमातून ज्या रुग्णांना रक्ताची गरज भासते, त्यांना रुग्णालयाजवळील रक्तपेढ्यांमध्ये जाऊन २६००० हून अधिक रक्तदात्यांनी वेळीच रक्त देऊन त्यांचे प्राण वाचवले आहेत.महापूर, भूकंप आदी नैसर्गिक आपत्ती तसेच कोरोना महामारीच्या काळातही संस्थानतर्फे रुग्णसेवा सुरू होती. आज संस्थानतर्फे ५३ रुग्णवाहिका २४ तास कार्यरत आहेत. याशिवाय समाज जागृती, लोक प्रबोधन, व्यसनमुक्ती, संस्कृतीचे संरक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन आदी विविध उपक्रमही सुरू आहेत. महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यक्रमात त्यांच्या कार्यक्रमांना मोठी गर्दी असते…उरण तालुक्यातील कानकेश्वरी मैदान, नवघर पाडा येथेही १८००० ते २०००० भाविक उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाचे पदाधिकारी, जिल्हा सेवा समिती उत्तर रायगडचे सदस्य, स्व स्वरूप संप्रदायाचे भक्तगण, शिष्यवर्ग, उपासक यांनी विशेष मेहनत घेतली.