नवी मुंबईत काळजाचा थरकाप उडवणारी घटना… दोन दिवसांपासून बेपत्ता झालेल्या मुलीचा मृतदेह सापडला…

0
21

नवी मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

नवी मुंबईत काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. तळोजा देवीचा पाडा येथे मंगळवारी दोन वर्षांची मुलगी गायब झाली होती…तळोजा पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी मिसिंग दाखल केली होती. आज तिचा मृतदेह तिच्याच राहत्या घरामध्ये पोटमाळ्यावर ठेवलेल्या सुटकेसमध्ये सापडल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,मंगळवार दि.२५ मार्च रोजी दुपारी हर्षिका शर्मा ही दोन वर्षांची मुलगी बेपत्ता झाली… याप्रकरणी तिच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली… त्यानंतर पोलिसांनी अपहरणाचा संशय व्यक्त करत हर्षिकाचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्याच दरम्यान हर्षिकाचा मृतदेह तिच्या घरात सापडला.हर्षिकाच्या घरातून रात्रीच्या वेळेस दुर्गंधी यायला लागली. तेव्हा हा घाणेरडा वास कुठून येतोय हे घरच्यांनी शोधायला सुरुवात केली.त्यावेळेस माळ्यावर शोध घेतला असता त्यांना एका पेटीमध्ये हर्षिकाचा मृतदेह आढळला. तिचे कुटुंब देवीचा पाडा गावातील माऊली कृपा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहत आहे…

हर्षिका शर्माच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे… बेपत्ता झालेल्या चिमुकलीचा मृतदेह तिच्याच घरातल्या एका पेटीत मिळाल्याच्या बातमीने मोठी खळबळ उडाली आहे… लहान मुलीचा अपघाती मृत्यू झाला की तिची हत्या करण्यात आली आणि तिचा मृतदेह पेटीत कुणी ठेवला’ याचा तपास नवी मुंबई पोलीस करत आहेत.