माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील) :-
शासन मान्य रास्त भाव दुकान क्र. ०१ येथील लाभार्थींना प्रशासकीय अधिकारी यांच्या देखरेखीखाली रेशनचे वाटप सुरु झाले आहे… सदर रास्त भाव दुकानात गेली अनेक महिने शेवटचे दोन तीन दिवस बाकी असताना वाटप होत असे…४०० कार्ड धारकांना पुरवठा व्यवस्थित होत नव्हता…
गेल्या महिन्यात तालुका पुरवठा अधिकारी शितोळे साहेब यांनी अचानक भेट देऊन एकंदरीत परिस्थिती पाहिली आणि स्वतः लक्ष देऊन दि. २४ पासूनच रेशनचे वाटप लाभार्थ्यांना मिळविण्यास पुढाकार घेऊन सहकार खाता कार्यलयाचे सहायक अधिकारी यांना या कामी देखरेखी साठी नेमून लाभार्थी यांना रास्त भाव दुकाना मधून धान्य वाटप सुरु केले आहे… दरम्यान बुधवार दि. २६ मार्च पर्यंत सुमारे १२५ हून अधीक लाभर्ती यांनी रेशन घेतले आहे व चालू आहे….
यादरम्यान गेली अनेक महिने रेशन वाटपाच्या दिवशी तसेच धान्य वाटपामध्ये अनियमितता होती… तांदूळ कमी करुन गव्हाचा कोटा वाढवून वाटप होत असे… मात्र या महिन्यापासून तांदूळ धान्य पूर्वीच्या कोट्या प्रमाणेच मिळू लागल्याने लाभार्थीमध्ये चर्चेचा विषय ठरला आणि यात भर म्हणजे अतिशय दर्जेदार व स्वच्छ धान्य वाटप होत आहे… सोबत अंत्योदय कार्डधारक महिला लाभार्थ्यांना शासन खादी ग्रामोद्योग वस्त्रोद्योग विभागाकडून दर्जेदार साड्यांचे वाटपही होत आहे…. रास्त भाव दुकान क्र. एक हा खरीदी विक्री संघ अंतर्गत लाभार्थ्यांना वाटप होत असे… मात्र मुदत संपल्याने रेशन वाटपामध्ये प्रचंड अनियमितता होत असे…. परिणामी त्यावर नियंत्रण नसल्याचे समोर येताच प्रशासकीय राजवटी येऊन तालुका पुरवठा अधिकारी यांनी वरिष्ठ पातळी यांना या दुकानाचा लेखी रिपोर्ट देऊन बरखास्त झालेल्या खरीदी विक्री संघाकडून नेमलेल्या पूर्वीच्या रेशन वाटपधारकांवर कारवाई करुन तसेच नवीन नियुक्ती करुन प्रत्येक महिनाच्या दहा तारखेच्या दरम्यान रेशन वाटपाला सुरु करण्याच्या सूचना द्याव्या असे बोलताना सांगितले… तर त्यांच्याकडून जे मार्गदर्शन मिळेल त्या प्रमाणे नवीन नियुक्ती करुन सर्व सुरळीत होईल तर सहायक निबंधक / सहकार खात्याचे प्रशासकीय अधिकारी अमूल निराडे यांची नेमणूक शासन मान्य रास्त भाव दुकान क्र. ०१ येथे रेशन वाटप प्रक्रिया देखरेखाली वाटप होत असताना दिसत आहे.