रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):-
रायगड जिल्हा रोहा तालुका एका येथे वरसे ग्रामपंचायत हद्दीतील चैतन्य अपार्टमेंट, येथे 2 ब्लॉक व रोहा अष्टमी नाक्यावरील एम्पायर प्लॅम ठिकाणी तीन ब्लॉग तर , नेहरूनगर येथील श्री योग एवेन्यू या ठिकाणी एक ब्लॉक असे एकूण सहा ठिकाणी बंद घरांच्या कडी कोयंडे तोडून चोरट्याने घरामध्ये प्रवेश करून घरातील कपाटातील दागिने व पैसे चोरून चोरटे पसार झाले . विशेष म्हणजे चोरी करण्यापूर्वी लगत असलेल्या सर्व फ्लॅट ना कडी कोयंडे बाहेरून लावून दुर्बिन वरती स्टिकर लावण्यात आले होते… या चोरट्यांनी वरसे ग्रामपंचायत हद्दीतील चैतन्य आपारमेंट मधील दोन ब्लॉक मधून रोग रक्कम दोन गळ्यातील सोन्याचे गंठण असा मुद्देमाल घेऊन पोबारा केलाची माहिती व अन्य दोन ठिकाणची घटना समोर येताच रोहा पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन संबंधित 6 ही ठिकाणचे पंचनामे करून रात्रभर सीसीटीव्ही फुटेज तपास करत आहेत .परंतु तशी अद्यावत माहिती अजून प्राप्त झालेली नाही. याकरिता घटनेस्थळी ताबडतो गुरुवारी सकाळी उजेडताच डॉग स्कॉड व फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांना पाचारण करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता आरोपीचा कशा पद्धतीने पोलीस शोध घेऊन त्यांच्या कधीपर्यंत मुसक्या आवळणार याकडे सर्व रोहेकरांचे लक्ष लागले आहेत…