अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
अलिबाग शहरात आज सकाळी पोलीसांनी संचलन केले… आगामी काळात गुढीपाडवा, रमझान ईद असे सण व रामनवमी, हनुमान जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरे होणार आहेत… तसेच गावोगावच्या ग्रामदैवतांच्या जत्रांचा हंगाम सुरू होत आहे… या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधीत रहावी आणि सर्व सण उत्सव शांततेत साजरे व्हावेतयासाठी रायगड पोलीसांनी विशेष दक्षता घेतली आहे…
आज सकाळी क्रीडाभुवन मैदानातून या संचलनाला सुरूवात झाली… शहरातील विविध भागांमध्ये फिरून अलिबाग पोलिस ठाणे इथे या रूटमार्चची सांगता झाली… अलिबागचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी या रूटमार्चचे नेतृत्व केले… नागरीकांनी आगामी सणांचा आनंद घेतना कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन किशोर साळे यांनी केले आहे… आजच्या रूटमार्चमध्ये अधिकारी, अंमलदार, वडखळ येथील राखीव कमांडो आणि राज्य राखीव पोलिस दलाची पलटण सहभागी झाली होती…