नैना प्रकल्प विषयी महत्वपूर्ण विधान भवनात लक्षवेधी सूचना… आ. विक्रांतदादा पाटील यांचा यशस्वी प्रयास…  

0
25

पनवेल शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार):-  

आ.विक्रांत दादा पाटील यांनी नैना प्रकल्प व त्यातील अडचणी संदर्भात विधान भवनात  लक्षवेधी सूचना मांडून सरकारचे लक्ष वेधून घेतल्यानंतर या विषयाची तातडीने विशेष बैठक लावण्याची मागणी केली होती… त्यानुसार पनवेल उरण मधील ग्रामस्थ व शेतकऱ्यांचे गंभीर प्रश्न घेऊन नगरविकास राज्य मंत्री श्रीमती माधुरीताई मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सिडको प्रशासनाची एक महत्वपूर्ण बैठक आज सिडको निर्मल भवन मुंबई येथे संपन्न झाली…

या बैठकी दरम्यान ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या प्रकल्प बाधित घरांना नियमित करणे, त्यांच्या  मूळ घरावर आरेखित केले गेलेले इतर शेतकऱ्यांचे  ४०% प्लॉट तथा त्यांच्या घरांवर टाकली गेलेली गार्डन्स, ओपन स्पेसेस व इतर आरक्षणे याबाबत आरक्षण इतरत्र हलवण्या संदर्भात बदल करून तातडीने निर्णय करणे,गावठाण लगतच्या बांधकामांना नियमित करण्यासाठी UDCPR मधील कंजेस्टेड एरियासाठीच्या तरतूदी लागू करणे, पुनर्विकासाकरिता वाढीव FSI देणे, रस्त्यात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या बांधकामांना योग्य मोबदला, पुनर्वसन याबाबत सकारात्मक निर्णय करणे, शेतकरी व ग्रामस्थानची योग्य पध्दतीने संवाद साधून त्यांच्या समस्यांचे निरसन करणे व अडचणी दूर करणे, या सर्व व इतर अति महत्त्वाच्या विषयांवर विस्तृत चर्चा झाली…

सिडको प्रशासनाने प्रश्न सोडविण्यासंदर्भात मंत्री महोदयांसमोर सकारात्मक भूमिका घेतली… येणाऱ्या कालावधी मध्ये हे सर्व प्रश्न सुटण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न व पाठपुरावा करण्यासाठी आम्ही काटीबद्ध असल्याचे आ. विक्रांत दादा पाटील यांनी सांगितले… या बैठकीस कोकण म्हाडाचे माजी सभापती श्री. बाळासाहेब जी पाटील, सिडको व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंगल, JMD शंतनू  गोयल, JMD गणेश  देशमुख, मुख्य लँड सर्वेअर समाधान खटकाळे, मुख्य नियोजन अधिकारी श्री. मानकर, अतिरिक्त नियोजन अधिकारी डॉ. प्रिया, मंत्री महोदयांचे स्वीय सहाय्यक डॉ. प्रशांत रसाळ यांच्यासह सिडकोचे सर्वच प्रमुख अधिकारी उपस्थित होते…