अलिबाग बसस्थानकात मनोरुग्णाचा उच्छाद… एसटी कर्मचारी व प्रवासी वर्गात घबराटीचे वातावरण…

0
34

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या रायगड जिल्ह्यातील अलिबाग आगारात आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास एक अनोळखी मनोरुग्ण याने उच्छाद मांडला होता…सदर मनोरुग्ण हा अलिबाग बस स्थानकात बस खाली झोपणे, बसमध्ये चढून उड्या मारणे तसेच येणाऱ्या जाणाऱ्या बसच्या मध्ये येणे तसेच प्रवाशाच्या पाठीशी धावत जाणे आदी प्रकार करत असल्याने एसटी कर्मचारी प्रवासी वर्गात घबराट निर्माण झाली होती. एसटी कर्मचारी यांनी तातडीने अलिबाग पोलिस ठाण्यात संपर्क करून पोलिस ना पाचारण केले. पोलिसांनी सदर मनोरुग्ण इसमास पोलिस गाडीत उचलून बसवले. आणि पोलिस ठाणे येथे घेऊन गेले.

मात्र सदर प्रकार घडत असताना महाविद्यालयातील महाविद्यालयीन विद्यार्थी व्हिडिओ आणि रील करण्यात गुंग झाली होती. विद्यार्थी व्हिडिओ करित असताना मनोरुग्ण इसम याचे लक्ष गेले तेव्हा तो बस स्थानकात चालू एस टी कडे न बघता धावत सुटला.सदर विद्यार्थ्यांना बस स्थानकात असणारे सुरक्षा रक्षक आणि कर्मचारी यांनी तेथून जाण्यास सांगितले असताना सुद्धा मुले ही जुमानत नव्हती.