पनवेल शिवसत्ता टाइम्स (दत्ता मोकल):-
चिंध्रण येथे सालाबादप्रमाणे ग्रामस्थ मंडळ व रोशन साई स्पोर्ट्स आयोजित आई मुजबा देवी सार्वजनिक उत्सव -२०२५ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला… यावेळी महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते… या कार्यक्रमात माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील, माझी पनवेल तालुका शेतकरी कामगार पक्षाच्या महिला गुलाब पाटील, पनवेल पंचायत समितीच्या माजी सभापती वृषाली पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती.. यावेळी ग्रामस्थांसहीत महिला मोठ्या संख्येने उपस्थीत होत्या… यावेळी वृषाली पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि महिलांना शुभेच्छा दिल्या…