नवी मुंबईतील थरारक घटनेची उकल… शेजाऱ्यांशी वादाच्या रागातून 3 वर्षांच्या चिमुकलीला संपवले…

0
104

नवी मुंबई  शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

शेजारी राहणाऱ्या तीन वर्षांच्या मुलीची हत्या करून तिचा मृतदेह तिच्याच घरात लपवल्याची खळबळजनक घटना नवी मुंबईमध्ये घडली आहे…नवी मुंबईमधील तळोज्यामध्ये हा प्रकार घडला आहे,यानंतर पोलिसांनी आरोपी मोहम्मद अन्सारीला अटक केली आहे…शेजारी राहणाऱ्या मुलीच्या हत्येचं कारण ऐकून पोलिसही चक्रावले आहेत…अन्सारी कुटुंबाचा लहान मुलांच्या खेळण्यावरुन शेजारच्या कुटुंबासोबत वाद होता…याशिवाय अन्सारी ऑनलाईन गेममध्ये 45 हजार रुपये हरला होता…त्या तणावातून अन्सारीने चिमुकल्या मुलीची हत्या केल्याचे सांगण्यात येत आहेत.   शेजारच्या मुलीशी होणाऱ्या वादातून तळोजात 3 वर्षीय मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीनं हत्या करून मुलीचा मृतदेह बॅगेत भरून लपवला होता. बेपत्ता मुलीच्या शोधासाठी कुटुंबीय गेले असताना घराच्या बाथरूममध्ये मृतदेह लपवण्यात आला होता.तळोजा पोलिसांनी मोहम्मद अन्सारी नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. मोहम्मद अन्सारी हा झारखंडचा राहणारा असून नवी मुंबईत स्लायडींगचं काम करतो. 25 मार्चपासून मुलगी बेपत्ता असल्याने कुटुंबियांनी तळोजा पोलीस ठाणयात तक्रार नोंदवली होती .अपहरणाचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी मुलीच्या शोधासाठी 5 पथकांसह डाॅगस्काॅडद्वारे तपास सुरू केला होता. पोलिस तपासात मोहम्मदवर संशय बळावल्याने पोलिसांनी केलेल्या चौकशीत मोहम्मदने हत्येची कबूली दिली. आरोपीनं मुलीच्या हत्येचा यापूर्वीच कट रचला होता. तसेच मुलीचे अपहरण करून तिच्या वडिलांकडे खंडणीही मागण्याचा आरोपीचा डाव होता. या प्रकरणी 3 वर्षाच्या मुलीच्या हत्ये प्रकरणी मोहम्मदला तळोजा पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी या प्रकरणाची माहिती दिली आहे. गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी त्या बिल्डींगमध्ये राहणाऱ्या सर्व साक्षीदारांकडे चौकशी केली…या चौकशीत मृत मुलीच्या घराच्या समोरच्या खोलीत राहणाऱ्या मोहम्मद अन्सारी याने त्या मुलीचा खून केल्याची कबुली दिली. तो मृतदेह स्वत:कडच्या बॅगेत लपवल्याची माहिती अन्सारीनं दिली,असे प्रशांत मोहिते. आई वडील घराबाहेर गेल्याची संधी साधून आरोपी मोहम्मद अन्सारीनं मुलीची हत्या केली. तीन वर्षाच्या मुलीची हत्या करत सुटकेसमध्ये तिचा मृतदेह भरुन ती बॅग बाथरुममध्ये लपवण्यात आला होता. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीनं हत्येची कबुली दिली आहे.
याच सर्व घटनेसंदर्भात त्या बिल्डींगमध्ये राहणारे रहिवाशी प्रवीण भोपी यांनी शिवसत्ता टाइम्स न्यूजला घडलेली हकीकत सांगितली पाहुयात…