रायगड जिल्‍हा शांतता समितीची बैठक पार… आदिती तटकरे यांच्‍या उपस्थितीत बैठक…   

0
20

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):- 

आगामी सण उत्‍सवांच्‍या पार्श्‍वभूमीवर रायगड जिल्‍हा शांतता समितीची बैठक महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्‍या उपस्थितीत पार पडली… यावेळी प्रामुख्‍याने सोशल मिडियावर नियंत्रण ठेवण्‍याबरोबरच सर्व प्रमुख शहरांमध्‍ये सीसीटीव्‍ही कॅमेरे बसवण्‍याबाबत सुचित करण्‍यात आले… सोशल मिडियावर नियंत्रण ठेवण्‍यासाठी तालुकावार पथके तयार करण्‍याच्‍या सूचना मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्‍या… प्रक्षोभक भाषणे टाळण्‍यासाठी कार्यक्रमाच्‍या आयोजकांना ज्‍या अटी शर्तीवर परवानगी दिली जाते त्‍याची प्रत कार्यक्रमाला येणाऱ्या पाहुण्‍यांनाही पाठवावी अशी सूचना आदिती तटकरे यांनी यावेळी केली…

अलिबागचे राजाभाऊ ठाकूर यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता… रायगड जिल्ह्यातील हिंदू मुस्लिम बांधव एकोप्याने राहतात… गणेशोत्सवात मुस्लिम बांधव हिंदूंना शुभेच्छा देतात… ईद सणाला हिंदू बांधव मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतात… मात्र काही लोक विनाकारण तेढ निर्माण करतात… असा मुद्दा काँग्रेस नेते राजाभाऊ ठाकूर यांनी मांडला…