तहसीलदार अभय चव्हाण यांनी केली १०० दिवस कृती आराखडाची पाहाणी …

0
49

चौक, शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम) :-

राज्य शासनाने जाहीर केलेल्या १०० दिवसांच्या कृती आराखडाची माहिती घेण्यासाठी तहसीलदार अभय चव्हाण यांनी क्षेत्रीय कार्यालयात भेट देऊन प्रत्यक्ष माहिती घेतली, यावेळी त्यांच्या सोबत निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड व महसूल अधिकारी सानप होते…
क्षेत्रीय कार्यालयांसाठी १०० दिवसांचा कृती आराखडा या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७ जानेवारी २०२५ रोजी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, परिक्षेत्रीय विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना दृक परिषदेद्वारे मंत्रिमंडळाच्या उपस्थितीत संबोधित केले आहे… राज्य शासनाच्या प्रशासनिक विभागांसाठी १०० दिवसांचा कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे… त्याच धर्तीवर या कृती आराखडाची पाहाणी तहसीलदार अभय चव्हाण यांनी ग्रामीण रुग्णालय चौक, ग्रुप ग्रामपंचायत चौक, ग्रुप ग्रामपंचायत तूपगाव, महसूल अधिकारी कार्यालय चौक या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन कामांची पाहणी केली… शासकीय व निमशासकीय कार्यालयांकरिता आगामी १०० दिवसांमध्ये  संकेतस्थळ, सुकर जीवनमान, स्वच्छता, जनतेच्या तक्रारींचे निवारण, कार्यालयातील सोयी व सुविधा, गुंतवणूक प्रसार, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी या मुद्यांवर प्रभावी कार्यवाही करण्याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत… या पार्श्वभूमीवर केलेल्या कामांची पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्त केले… यावेळी त्यांच्या सोबत निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड, ग्रामीण रुग्णालय चौक येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी सोनावले, डॉ.राजन यादव, महसूल मंडळ अधिकारी माणिक सानप, ग्राम पंचायत अधिकारी सचिन कुराडे, अमोल वाघ, तलाठी अक्षय गावडे, सुदर्शन पालवे, कार्यालय कर्मचारी उपस्थित होते….