अलिबाग शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या रायगड जिल्ह्यातील अलिबाग आगारात परिवहन मंडळाकडून पाच बसेस दोन दिवसापूर्वी देण्यात आल्या आहेत.या बसचे लोकार्पण अलिबाग मुरुड आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते करण्यात आले…यावेळी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या रायगड विभागाचे नियंत्रक दीपक घोडे,अलिबाग आगर प्रमुख देवरे, यांच्यासहित आगारातील अधिकारी कर्मचारी तसेच प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते…
रायगड जिल्ह्यातील आगारात जुन्या एसटी बस असल्याची ओरड कायमच राहिली आहे. प्रवासी वर्गातदेखील या जुन्या एसटीबद्दल नाराजी निर्माण झाली होती…आता मात्र हा संताप थांबणार आहे…जिल्ह्यात 15 नव्या एसटी बसेस दाखल झाल्या आहेत. सुरुवातीला अलिबाग, पेण व महाड आगारात प्रत्येकी पाच एसटी बस देण्यात आल्या आहेत. रायगड एसटी प्रेमींच्या मागणीची दखल घेत शासनाने नव्या एसटी बसेस दिल्या आहेत.
एसटी महामंडळ रायगड विभागाच्या अखत्यारित अलिबाग, पेण, रोहा, कर्जत, महाड, माणगाव व श्रीवर्धन ही सात एसटी बस आगार आहेत…जिल्ह्यात 19हून अधिक एसटी बस स्थानके असून 439 एसटी बसेस आहेत. त्यात 260 सीएनजी बसचा समावेश आहे…अलिबागसह पेण आगारात सीएनजीवर चालणारी एसटी बसेस आहेत…दरम्यान, एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे…मात्र,जून्याच गाड्यांच्या भरोवश्यावर जिल्ह्याचा कारभार चालत असल्यामुळे जून्या गाड्यांतून प्रवास करताना प्रवाशांना त्रास होत होता.
रायगड एसटी प्रेमींनी प्रवाशांची ही समस्या ओळखून परिवहन मंत्री यांची भेट घेतली. जिल्ह्यात नव्या एसटी बसेस देण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली होती. अखेर या मागणीची दखल घेत शासनाकडून रायगड जिल्ह्यात 15 एसटी बसेस देण्यात आल्या आहेत. अलिबाग, महाड व पेण आगारात प्रत्येकी 5 एसटी बस देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आता 454 इतक्या एसटी बसेस असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.