मुंबई शिवसत्ता टाइम्स(देवेंद्र मोरे):-
प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या दोन इंग्रजी पुस्तकांचा प्रकाशन सोहळा मुंबईत पार पडला. या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. या समयी बोलताना मंत्री नितीन गडकरी यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे शंभर टक्के सेक्युलर राजे होते, त्यांच्या सैन्यात मुस्लिम देखील होते… असे प्रतिपादन केले. सेक्युलर म्हणजेच सर्वधर्म समभाव, सर्व धर्म आणि त्या त्या धर्माच्या रयते सोबत समान न्याय करणे. म्हणूनच “निश्चयाचा महामेरू, अखंड स्थितीचा निर्धारू, बहुत जनांशी आधारू, श्रीमंत योगी” असे राष्ट्रसंत रामदास स्वामींनी म्हटले आहे…असे गडकरी पुढे म्हणाले…
छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य प्रेरणादायी आहे… आमच्या आई-वडीलांपेक्षाही आमच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्थान मोठे आहे असेही नितीन गडकरी यांनी सांगत सर्वांना संबोधित केले की, छत्रपती शिवरायांची महती सांगणारी पुस्तके इंग्रजी माध्यमातून प्रकाशित होणे ही खरोखरच मोठी गोष्ट आहे.

