महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे) :-
वलंग शिक्षण प्रसारक मंडळाचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृह,वलंग,ता.महाड येथे इ.५वी ते १०वी मराठी माध्यमाचे मुलांसाठी प्रवेश सुरू करण्यात आला आहे. एस सी व एस टी प्रवर्गासाठी ३० जागा आरक्षित असून मोफत प्रवेश आहे तर विनाअनुदानित तत्वावर पालकांचे आग्रहास्तव खुला-अराखीव जातीची अट नाही अशा २० अधिकच्या जागा विद्यार्थ्यासाठी अल्प फीमध्ये प्रवेश उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरी महाड शहर परिसरातील व ग्रामीण भागातील तसेच कोकणातील व सध्या विरार,’नालासोपारा’,दिवा येथे वास्तव्यास असलेल्या पालकांनी आपल्या मुलांसाठी प्रवेश निश्चित करावा व दर्जेदार निवासी शैक्षणिक सुविधेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी शनिवार दि.५ एप्रिल २०२५ रोजी चवदार तळे महाड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सकाळी १० वा.प्रवेशासंबंधी माहिती शिबीराचे आयोजन संस्था अध्यक्ष श्री.अनंत रेवाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत केले आहे. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा.