वाटेत बस बिघडल्यास मागाहून येणाऱ्या त्याच मार्गावरील एसी सह कोणत्याही एस.टी. बसमधून त्याच तिकीटावर प्रवासाची मूभा…

0
20

मुंबई शिवसत्ता टाइम्स(देवेंद्र मोरे):-

एस. टी. बस वाटेत बिघडल्यास मागाहून येणाऱ्या त्याच मार्गावरील एस. टी. बसमधून कोणताही अधिकचा आकार प्रवाशांकडून न घेता त्यांना पुढील इच्छित स्थळीच्या प्रवासासाठी जाण्यासाठी  मुभा आता असणार आहे… आणि विशेष म्हणजे मागाहून आलेली लाल परी, शिवनेरी, हिरकणी, शिवशाही बस असो अथवा वातानुकूलित किंवा सेमी असेल तरीही आता प्रवाशांना प्रवास करणे शक्य होणार आहे… ऐन उष्मा काळात सामानसुमानासकट प्रदीर्घ काळ ताटकळत बसणे यापासून अशा प्रवाशांच्या दृष्टीने एस. टी. व्यवस्थापकीय महामंडळाचा हा मोठा निर्णय आहे…

पूर्वी साध्या बसमधून प्रवास करताना वाटेत बस बिघडल्यास मागून त्याच मार्गावरील येणाऱ्या तशाच साध्या बसमधूनच प्रवाशांना आपला प्रवास करावा लागत असे… मात्र एस. टी. महामंडळाच्या नवीन निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे…