कामावर जातो सांगून गेलेला अराफत घरी परतलाच नाही… सुदर्शन कंपनीत काम करणारा 36 वर्षीय अराफत बेपत्ता…

0
113

महाड शिवसत्ता टाइम्स (रेश्मा माने):-

महाड औद्योगिक वसाहतीमध्ये सुदर्शन कंपनीत कामावर जातो अशा सांगून महाड शहरात वास्तव्यास असणारा अराफत सलाम जमादार वय वर्ष ३६ हा व्यक्ती हरवल्याची तक्रार महाड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आले असून याबाबत कोणाला समजल्यास महाड शहर पोलीस ठाण्यात कळवण्याच् आवाहन पोलीस निरीक्षक यांनी केले आहे…

याबाबत अधिक माहिती अशी की महाड शहरातील वाईट हाऊस या इमारतीत राहणारा व लेबर चे काम करणारा आराफत सलाम जमादार ही व्यक्ती सुदर्शन कंपनीत कामाला जाते असे सांगून पाच एप्रिल पासून बेपत्ता झाली असून रंगबोरा डोळे काळसर तपकिरी केस काळे उंची अंदाजे ५. ८ फोटो अंगात पांढऱ्या रंगाचा फुल बायाचा शर्ट काळा रंगाची साधी पॅन्ट पायात काळा रंगाची शक्ती शोध छाती वरती… तीळ गळ्यामध्ये काळा रंगाचा दोरा अशा वर्णनाची व्यक्ती सापडल्यास महाड शहर पोलीस ठाण्यास कळवण्याच्या अहवाल महाड शहर पोलिस यांनी केले आहे…