रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
रायगडच्या खालापूर तालुक्यातील केमट्रॉन सायन्स लॅबोरेटरी कंपनी प्रा. लि. डोनवतच्या कामगारांनी दि.2 एप्रिलपासून बेमुदत संप पुकारला आहे…कामगारांच्या न्यायिक हक्क अधिकारासाठी भारतीय कामगार सेनेच्या नेतृत्वात आपण हा संप पुकारला असून जोपर्यंत कंपनी प्रशासनाकडून मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप मागे घेणार नाही, असा इशारा कामगारांनी दिला आहे…वेतनात वाढ करणे, वेतन वाढीचा करार करणे, डी ए भरणे,मेडिकल क्लेम देणे , पेमेंट ऑफ ग्रॅज्युएटी कायद्यानुसार त्यांच्या सेवेतून निवृत्त झालेल्या कामगारांना ग्रॅज्युएटी देणे आदींसह अन्य मागण्यांसाठी हा बेमुदत संप पुकारला असल्याचे कामगारांनी सांगितले.