९ लाख ५१ हजारांच्या ५० मोबाईलचा घेतला शोध… गहाळ झालेले मोबाईल मूळ मालकांना केले परत…

0
31

नवी मुंबई शिवसत्ता टाइम्स (दीपक कांबळे):- 

नवी मुंबई आयुक्तालयाअंतर्गत पोर्टलचा प्रभावीपणे वापर करुन मोबाईल चोरीचा सामना करण्यासाठी तसेच गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्याकरीता आणि मोबाईल सुरक्षा वाढविण्याकरीता Central Equipment Identify Register (CEIR) हा प्रोजेक्ट राबविण्यात येत आहे…हरवलेले मोबाईल फोन याबाबतची तक्रार नोंदवण्याकरीता नागरिकांना भारत सरकारद्वारे CEIR पोर्टल सुरु करण्यात आले आहे…त्याअनुशंगाने खारघर पोलीस ठाणे,नवी मुंबई हद्दीतील सन 2025 माहे मार्चपर्यंतचे गहाळ झालेल्या मोबाईल पैकी एकुण 50 CEIR पोर्टलद्वारे खारघर पोलीसांनी यशस्वीरीत्या हस्तगत करुन मुळ मालकांना हस्तांतरण केले आहे.

यामध्ये आयफोन 2,वन प्लस 7,सॅमसंग 9,रियल मी 7, रेडमी 6,ओप्पो 6,विवो 4,मोटरोला 1, पोको 3, हनोर 3, आयटेल 1,नोकिया 1 कंपन्यांचे मोबाईल हस्तगत करण्यात आले… पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे,अप्पर पोलीस आयुक्त संजय येनपुरे, मा.पोलीस उप आयुक्त परिमंडळ-02, पनवेल प्रषांत मोहिते,सहा. पोलीस आयुक्त पनवेल विभाग श्री. अषोक राजपुत साो यांच्या मार्गदर्षनाखाली खारघर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. दिपक सुर्वे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती शितल पाटील यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकामधील सपोनि/प्रदिप आव्हाड, पोउपनि/सुरज जाधव, सहापोउपनि/फिरोज आगा, पोलीस हवालदार प्रषांत जाधव, सुरेष कासार, मच्छिंद्र खेडकर, श्रीकांत म्हात्रे, सागर पाटील, वाजिद षेख,सतिष मकासरे, सुरज वायदंडे, राहुल ढावरे यांनी विविध जिल्हयांतुन व राज्यांमधुन आतापर्यंत रुपये 09,51,000/- किंमतीचे एकुण 50 मोबाईल हस्तगत केले आहेत. याआधी 14 जुलै 2024 रोजी 82 लाख 50 हजार रुपये किमतीचे एकूण 84 मोबाईल देण्याचा कार्यक्रम खारघर पोलीस ठाण्याकडून पार पडला त्यानंतर आज पुन्हा नऊ महिन्यानंतर 50 मोबाईल वाटप करण्याचा कार्यक्रम राबविण्यात आला.

तरी सदरचे हस्तगत मोबाईल फोन हे दिनांक. 06/04/2025 रोजी मोबाईलचे मुळ मालक यांना संपर्क साधुन पोलीस ठाणे येथे बोलावुन त्यांचे मोबाईल मा. वरिष्ठांच्या हस्ते सन्मानपुर्वक परत करण्यात आलेले आहेत. मोबाईल फोन परत मिळालेल्या नागरिकांनी जनमानसातील पोलीसांची प्रतिमा उंचविल्याबाबत पोलीस ठाणेकडील सर्व अधिकारी व अंमलदार विषेश करुन वाजिद षेख (तांत्रिक विष्लेशक) यांचे आभार मानून कौतुक केले आहे…