रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):-
गेल्या काही दिवसांपासून कोकणात ठाकरे गटाला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. पक्षाचे अनेक नेते कार्यकर्ते पदाधिकारी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत सत्ताधारी पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत… गेल्या काही दिवसापूर्वीच शिवसेना ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला होता. त्यांच्यानंतर आणखी एक नेता म्हणजेच शिवसेना ठाकरे गटाचे रोहा तालुकाप्रमुख समीर शेडगे यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे…प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे,अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांसह समीर शेडगे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केला आहे…रोह्यातील राम मारुती चौकामध्ये हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला…शेडगे यांच्या संघटन कौशल्याचा पक्षवाढीला निश्चितच फायदा होईल असा विश्वास सुनील तटकरे यांनी यावेळी व्यक्त केलाय…तब्बल आठ वर्षानंतर शेडगे यांची घरवापसी पाहायला मिळाली… काँग्रेसमधून बाहेर पडत त्यांनी अपक्ष निवडणूक देखील याआधी लढवली होती… आणि त्यानंतर आता सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केलाय…