किहीम चे सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड यांना धमकावले…

0
102
Oplus_131072

अलिबाग शिवसत्ता टाइम्स ( धनंजय कवठेकर) :-

अलिबाग तालुक्यातील रेवस मार्गावर किहीम आणि सातीर्जे गावाच्या रस्त्याच्या कामावरून श्रेयवादाची लढाई सुरू आहे. आणि आता ही लढाई मांडवा सागरी पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचली आहे. किहीमचे सरपंच पिंट्या गायकवाड आणि त्यांच्या कुटुंबियांना राजेंद्र ठाकूर यांनी धमकावल्याची तक्रार करण्यात आली आहे. प्रकरणी मांडवा सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. किहीम आणि सातीर्जे गावच्या वेशीवर रस्त्याचे काम सुरू आहे. हे काम आपण मंजूर करून आणले असा दावा राजेंद्र ठाकूर आणि पिंट्या गायकवाड दोघेही करीत आहेत. रस्त्याच्या कामाचा नारळ फोडताना दोघांमध्ये हमरीतुमरी झाली. यावेळी राजेंद्र ठाकूर यांनी शिवीगाळ करीत धमकावले अशी तक्रार पिंट्या गायकवाड यांच्या पत्नी प्रीती गायकवाड यांनी पोलिसात केली आहे.