अलिबाग शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन) :-
सागरी पर्यटनसाठी जग प्रसिद्ध असलेल्या मुरुड तालुक्यातील मौजे मुरुड समुद्रनजिक असलेल्या शी सेल या हॉटेलच्या खाली असणाऱ्या जलतरण तलावात पाच वर्षीय माही चक्रधर ताकभातेहिचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून याबाबत मुरुड पोलिस ठाण्यात मयत हिचे वडील चक्रधर कृष्णा ताकभाते (वय ३४ वर्ष, व्यवसाय- नोकरी सध्या रा सध्या रा फ्लॅट नं ४०३ आतुल्य रचना सोसायटी क्रांतीवीर नगर थेरगाव पुणे, मुळ रा श्रीपत पिपंरी ता बार्शी, जि सोलापुर ) यांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, चिंचवड पोलिस आयुक्त कार्यालय अंतर्गत असणाऱ्या सांगवी पोलीस ठाण्याते पोलिस उप निरीक्षक म्हणून कार्यरत असणारे चक्रधर कृष्णा ताकभाते हे त्यांचे तुळजापूर येथे गट विकास अधिकारी असलेले चुलत भाऊ अमोल ताकभाते या दोघांचे कुटुंबीय हे रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा येथे सागरी पर्यटनासाठी आले होते. त्यांनी मुरुड शहरात प्रवेश करतानाच सुरवातीला असलेल्या हॉटेल शी सेल मध्ये दिनांक १८ एप्रिल २०२५रोजी दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी हॉटेलच्या अभ्यागत कक्ष येथून तिसऱ्या मजल्यावर असलेल्या रूमच्या किल्ल्या घेऊन वरती गेले त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक चक्रधर ताकभाते आणि गटविकास अधिकारी अमोल ताकभाते या दोघांच्या पत्नी ह्या एका रूम मध्ये जाऊन गप्पागोष्टी करू लागल्या म्हणून उपनिरीक्षक चक्रधर ताकभाते आणि गटविकास अधिकारी अमोल ताकभाते हे दोघेही दुसऱ्या रूम मध्ये गेले होते. त्याच वेळी पोलिस उपनिरीक्षक चक्रधर ताकभाते यांची कन्या माही आणि गटविकास अधिकारी अमोल ताकभाते त्यांची पाच वर्षीची कन्या माही आणि गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांची कन्या आन्वी, (वय ५ वर्षे,) अश्या दोघीही कोणालाही काही न विचारता दुपारी दोनच्या सुमारास तिसऱ्या मजल्यावरून खाली खेळण्यासाठी गेले असता, माही हिने जलतरण तलाव पाहून तलावच्या बाजुला चप्पल काढुन ती जलतरण तलावमध्ये उतरली. ती बुडत असल्याचे पाहून आन्वीही हॉटेल शी शेल च्या तिसऱ्या मजल्यावर परत गेली अन् सांगितले की माही खाली असलेल्या तलावात बुडत आहे. हे ऐकून पोलिस उपनिरीक्षक चक्रधर ताकभाते आणि गटविकास अधिकारी अमोल ताकभाते खाली धावत आले.
तीला तिचे वडील चक्रधर ताकभाते आणि काका अमोल ताकभाते यांनी पाण्याबाहेर काढुन तिला ग्रामीण रुग्णालय मुरूड येथे दाखल करुन तेथील डॉक्टरांनी माहीला र्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन (सी.पी.आर. )व इलेक्ट्रोकार्डियोग्राम (ई.सी.जी. ) ही वैद्यकीय चाचणी केली असता तीच्या कडुन काही एक प्रतिसाद न मिळाल्याने डॉक्टरांनी तिस दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी मयत घोषीत केले. माही हिचे शव विच्छेदन करून तिचा मृतदेह हा सायंकाळी साडे सहाच्या सुमारास व्वडील चक्रधर ताकभाते यांच्या स्वाधीन करण्यात आला.