खोपोली शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-
मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर खंडाळा घाटात बॅटरी हिल अमृताजन ब्रीज जवळ एका भरधाव वेगातील मालवाहु ट्रकने समोरील पाच वाहनांना धडक दिल्याने झालेल्या अपघातात बापलेकीचा मृत्यू झाला तर १२ जण जखमी झाले. जखमींपैकी ४ जणांना गंभीर दुखापती झाल्या असून त्यांना पुढील उपचारार्थ पनवेल, खोपोली, लोणावळा येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबई पुणे जुन्या महामार्गावरून रात्री लोणावळाहून ट्रक रात्री 10 वाजण्याच्या सुमारास खोपोली कडे जात असताना खंडाळा घाटात बॅटरी हिल गावाजवळ आला असता त्याचे ब्रेक फेल झाल्याने त्याने समोरील ईनोव्हा, एर्टिका, रिक्षा, टाटा पंच व एक हायवे पेट्रोलिंगचे वाहन अशा पाच वाहनांना धडक दिली . यात एनिव्हो आणि एर्टिगाचा चक्काचूर झाला आहे, तर एर्टिगा मधील बाप आणि लेकीचा मृत्यू झाला आहे, या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, लोणावळा, खंडाळा पोलीस यांच्यासह खोपोली येथील अपघातात ग्रस्तांच्या मदतीसाठी या संस्थेचे स्वयंसेवक आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, महाराष्ट सुरक्षा बल, पवना आणि लोकमान्य हॉस्पिटलच्या ॲम्बुलन्स, स्वामिनी ॲम्बुलन्स सर्विसेस या सर्व यंत्रणा अपघात स्थळी दाखल होऊन मदत कार्य केले आणि जखमींना रूग्णालयात केले. या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती… अपघातग्रस्त वाहने बाजूला काढल्यानंतर वाहतूक पूर्वपदावर सुरू झाली.