बारवई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जल्लोषात साजरी… ध्वजारोहण तदनंतर बुद्ध पूजापाठ विशेष कार्यक्रम…

0
70

रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार):-

आदर्श मित्र मंडळ रमाई महिला मंडळ बारवई, तालुका पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानाने भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ वा जयंती महोत्सव मोठा जल्लोषात साजरा करण्यात आला… सालाबाद प्रमाणे यंदाही पनवेल तालुक्यातील बारवई येथे आदर्श मित्र मंडळ आणि रमाई महिला मंडळ यांनी सुंदर रित्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते… सकाळी ९:३० वाजता ध्वजारोहण तदनंतर बुद्ध पूजापाठ कार्यक्रम घेण्यात आला… दुपारी लहान मुले व महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते… सायंकाळी येथूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली… डीजे ढोल ताशाच्या गजरात व फटाक्यांच्या आताषबाजीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व महापुरुषांच्या जय घोषाने संपूर्ण परिसर दणाणून निघाला… मिरवणुकीमध्ये आबाल, वृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले होते… रात्री अजय गायकवाड प्रस्तुत आर्केस्ट्रा “रायगडचा टायगर” या भीम गीतांचा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला… महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक अजय गायकवाड व सुमेध जाधव आणि सहकाऱ्यांनी भीमगीते व प्रबोधनात्मक गीते सादर करून साऱ्यांची मने जिंकली… कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदर्श मित्र मंडळ, रमाई महिला मंडळ (बारवई) यांनी विशेष मेहनत घेतली…