पालिकेकडून ३५ वर्षे जुने पार्श्वनाथ जैन मंदिर जमीनदोस्त… जैन मंदिर तोडल्याच्या निषेधार्ह धडक मोर्चा व रॅलीचे आयोजन…

0
73

मुंबई शिवसत्ता टाइम्स (शेखर म्हात्रे):- 

मुंबई विलेपार्ले रेल्वे स्टेशनलगत असणाऱ्या कांबळीवाडीजवळ दोषी शहा या बांधकाम व्यावसायिकाने बांधलेले सुमारे पस्तीस वर्षे जुने जैन मंदिर हे पालिकेच्या के पूर्व वॉर्डच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करत जमीनदोस्त केले…16 तारखेला सकाळी 8 वाजता पालिकेचे के पूर्व वॉर्ड अधिकारी नवनाथ घाडगे यांच्या कारवाईनुसार जैन मंदिर ट्रस्टला तातडीने प्रस्ताव पाठवत पोलिसांच्या मोठया फौजफाटा तैनात करत सकाळी सकाळीच मुंबई न्यायालय सुरु होण्या अगोदरच जेसीबीच्या साहाय्याने जैन मंदिर जमीनदोस्त करण्यात आले. हे जैन मंदिर ना पालिकेच्या हेरिटेज विभागात येत नव्हते कि कोणत्याही कार्यात अडसर नव्हते. तरीही पार्श्वनाथ जैन मंदिरावर पालिकेच्या के पूर्व वॉर्ड अधिकारी असलेला नवनाथ घाडगे यांनी के आर हॉटेल च्या मालकाच्या सांगण्यावरून हे जैन मंदिर जबरदस्तीने तोडायला सांगितले. कोर्टात याबाबत सुनावणी होणार परंतु तर मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीमध्ये एक मिटिंग सुद्धा झाली होती तरीही कोणालाही कल्पना दिली नाही सरळ जैन मंदिर पाडण्यात आले…

तर आर. के. हॉटेल व्यवसायिक आणि पालिका के पूर्व वॉर्ड अधिकारी नवनाथ घाडगे यांना तातडीने बडतर्फ करण्यात यावे, आमचे जैन मंदिर ज्या मूळ जागेवर आहे त्याच जागी आम्हाला आमच्या समाजाचे जैन मंदिर नव्याने आणि लवकरात लवकर बांधून देण्यात यावे, आमच्या समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. अहिंसानक प्रकारे आमचे मंदिर आमच्या हवन कुंड, हवन सामग्री,दानपेटी, यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आमच्या ह्रदयात याचा परिणाम झाला आहे. आमच्या जैन मुनी संतापले असून काहीही अपरिहार्य गोष्टी नसताना पालिका अधिकाऱ्याने एका हॉटेल व्यवसायकाच्या सांगण्यावरून सरळ आमच्या काळजावर घाव टाकण्याचा प्रकार घडलाय.

मुंबई विलेपार्ले रेल्वे स्टेशनं जवळच असणाऱ्या कांबळीवाडी जैन मंदिर ते पालिकेच्या अंधेरी पूर्व इथे असणाऱ्या के पूर्व वॉर्ड कार्यालय असा अहिंसा आक्रोश मोर्चा आणि रॅली काढण्यात आली. यावेळी ऑल इंडिया जैन समाज रस्त्यावर उतरला होता. तब्बल 1 ते 2 लाखांच्या संख्येने जैन बांधव या अहिंसा आक्रोश मोर्चा आणि रॅलीत सहभागी होताना दिसून आला. जैन बांधव प्रचंड आक्रमक होताना दिसला. 10008 पार्श्वनाथ जैन मंदिर चे अध्यक्ष अनिलभाई शहा,प्रवीणभाई शहा,पियुष भाई जैन, राजेश भाई जैन, विकास अच्छा, रोशन केलावत, भरत बाफना,हर्ष जैन, तर भाजपचे मंगलप्रभात लोढा,काँग्रेस खासदार वर्षाताई गायकवाड, विलेपार्ले पूर्व चे आमदार पराग अळवानी, मुर्जी पटेल सहित जैन समाजाचे सर्व जैन मुनी, ट्रस्टी, अधिकारी मंत्री आणि संपूर्ण जैन समाज रस्त्यावर उतरला होता.