नागपूर महानगरपालिकेचा ७५व्या अमृत महोत्सवी वर्षात  पदार्पण… अमृतमहोत्सवाची दि. २ मार्च पासून २०२५ झाली आहे सुरुवात…

0
31

नागपूर शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे):- 

कधीकाळी राज्याची राजधानी असलेल्या नागपूरला आता महाराष्ट्र राज्याच्या उप-राजधानीचा दर्जा मिळाला आहे. नागपूर महानगर पालिकेची स्थापना दि. २ मार्च १९५१ रोजी झाली. महानगर पालिकेच्या अमृत महोत्सव वर्षाला दि. २ मार्च २०२५ पासून सुरुवात झाली आहे.हेच औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते हैदराबाद हाऊसमधील सभागृहामध्ये महानगरपालिकेच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. महानगर पालिकेच  सर्व पत्रव्यवहार तसेच इतर प्रशासकीय कामकाजांमध्ये या बोधचिन्हाचा रितसरपणे उपयोग करण्यात येणार आहे. याप्रसंगी या बोधचिन्हाचे रचनाकार विवेक रानडे देखील उपस्थित होते…

नागपूर महानगरपालिकेला आजपर्यंत एकूण ५० मनपा आयुक्तांची सेवा लाभली आहे. नागपूर शहराला महाराष्ट्र राज्याची उप-राजधानी म्हणून दर्जा प्राप्त असून नागपूरसाठी आधी C.N.C. Act 1948 अंमलात होता. आता राज्य शासनाच्या आदेशान्वये संपूर्ण राज्यात एकच कायदा लागू करण्यात आला आहे. नागपूर महापालिकेमध्ये काम करणारे जे. एस. सहारिया आणि मनुकुमार श्रीवास्तव यांना राज्याच्या मुख्य सचिव पदावर काम करणाचा सन्मान प्राप्त झाला आहे. तसेच आयुक्त म्हणून काम केलेले इतर अधिकारी देखील राज्य शासनात वेगवेगळ्या पदांवर काम करीत आहेत.      शिवाय विद्यमान आमदार कृष्णा खोपडे, प्रवीण दटके, विकास ठाकरे, संदीप जोशी हे सुद्धा नागपूर महानगरपालिकेचे महापौर व उप-महापौर राहिले आहेत.महापालिकेच्या इतिहासात आता पर्यंत ५४ महापौर, ५६ उप-महापौर, ५० आयुक्त यांची सेवा नागपूर महानगर पालिकेला लाभली आहे.

शासनाने १९५१ मध्ये नागपूर मनपाचे प्रशासक म्हणून जी. जी. देसाई यांची नियुक्ती केली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली जून १९५२ मध्ये महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांना प्रथम महापौर होण्याचा मान मिळाला. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोनदा महापौर पद भूषविले होते.अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त महानगरपालिकेने विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन केले आहे. शहराच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या महापुरुषांच्या आठवणींना  दरम्यान उजाळा देण्यात येणार आहे.