उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):-
दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी जागतिक पुस्तक दिनानिमित्त माॅंसाहेब मीनाताई ठाकरे ग्रंथालया मध्ये सुयश क्लासेस २५ ते ३० विद्यार्थी तब्बल २ तास एका ठिकाणी शांतपणे विविध पुस्तक भावले ते वाचून पुस्तक घेऊन त्यामध्ये रममाण झाले होते.
दोन तासांनी त्यांना सांगावे लागले आता आपण वाचलेल्या पुस्तकाबद्दलची थोडक्यात गोष्ट रूपात माहीती सांगावी. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे खूप छान थोडक्यात आपण जे वाचले ते साररुपात उत्तम प्रकारे व्यक्त झाले.
त्यानंतर ग्रंथपाल संतोष पवार यांनी अभ्यासाचे महत्त्व – शिक्षण हा आपल्या उज्ज्वल भवितव्याचा पाया आहे हे विद्यार्थ्यांना पटवून दिले. हा पाया जेवढा मजबूत तेवढी उज्ज्वल यशाची ईमारत तेवढी उंच आणि मजबूत घडणार हे उदाहरणासह मुलांना पटवून दिल्यामुळे विद्यार्थी मुले मुली खूप खूष झाली आणि म्हणाली आम्ही या पुढे लायब्ररीमध्ये नक्की येणार असेही विद्यार्थ्यांनी आपले मत स्वेच्छेने व्यक्त केले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथालयातील विद्यार्थी चेतन सोदारी, शिक्षक दिपक वायदाडे , शिक्षिका मनिषा म्हात्रे, शिक्षिका हेमांगी घरत , पालक स्वाती मोरे उपस्थीत होते विद्यार्थ्यांना लहान वयात वाचनाची गोडी लागणे आवश्यक आहे म्हणून वाचनालयातील सर्व विद्यार्थी आणि वाचकांनी उत्तम सहकार्य केले.