स्विमिंग पूलमध्ये बुडून 2 वर्षीय अतिक्षाचा मृत्यू… स्विमिंग पूलमध्ये बुडालेल्या अवस्थेत तरंगताना मृतदेह…

0
14

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-  

मुरुड येथील स्विमिंग पूलमध्ये बुडून पाच वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना ताजी असतानाच चोंढी-बामणसुरेजवळ असलेल्या रिसॉर्टमधील स्विमिंग पुलमध्ये बुडून एका दोन वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी (दि. २४) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडमधील एका रिसॉर्टमध्ये केअर टेकर म्हणून कामाला असलेल्या व्यक्तीची ती मुलगी होती.अतिक्षा सुरेंद्रकुमार दास असं चिमुकलीचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे…गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास  पाण्याचे टँकर आल्याने मुलीला सोडून तो गेला. थोड्या वेळाने आल्यावर पाहिले असता, मुलगी स्विमिंग पूलमध्ये बेशुद्ध अवस्थेत दिसून आली. अतिक्षाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून तिला मृत असल्याचे घोषित केले….