नवेदर बेलीतील पाटील कुटुंबियांचे सांत्वन… शेकापच्या चित्रलेखा पाटील,मानसी म्हात्रे यांची भेट…

0
25

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-   

रेवस मार्गावरील मानीफाटा येथे कार आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातामध्ये नवेदर बेली येथील पती पत्नी जागीच ठार झाले.शेकापच्या राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे , शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी पाटील कुटूंबियांची सांत्वनपर भेट घेतली. त्यांच्या कायम पाठीशी असणार असे आश्वासन यावेळी देण्यात आले.

अपघातामध्ये मृत झालेल्या विश्‍वास पाटील (48) व कल्पना पाटील (42) असे या पती, पत्नीची नावे असून दोघेही नवेदर बेली येथील रहिवासी आहेत.अलिबाग तालुक्यातील नवेदर बेली येथील विश्वास पाटील आणि कल्पना पाटील यांचा भीषण अपघात झाला होता…या अपघातात निष्पाप पती-पत्नी यांचा मृत्यू झाला होता…या झालेल्या घटनेमुळे पाटील कुटुंबियांवर दुख:चा डोंगर कोसळला, पाटील कुटुंबियांची सांतवनपर भेट घेवून त्यांचा एकुलता एक मुलगा व कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे आणि शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील व शेकाप कायम पाठीशी राहील असे आश्वासन दिले. यावेळी शेकापचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते…