नवी मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने नवी मुंबईत जोरदार तयारी केली असून प्रभाग क्रमांक २१ मध्ये गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखालील विकासाच्या पॅनलला नागरिकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. “विकासाचं पॅनल, आपलं हक्काचं पॅनल” या स्पष्ट भूमिकेसह भाजपाने निवडणूक रणांगणात उतरून विश्वासार्ह आणि सक्षम पर्याय जनतेसमोर ठेवला आहे.
प्रभाग क्रमांक २१ हा नवी मुंबईतील महत्त्वाचा प्रभाग मानला जात असून येथे भाजपाच्या अधिकृत आणि लोकप्रिय उमेदवारांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. माधुरी जयेंद्र सुतार, मिरा संजय पाटील, जयवंत दत्तात्रेय सुतार आणि सुरेश गोपाल शेट्टी हे चारही उमेदवार स्थानिक पातळीवर परिचित असून त्यांनी आतापर्यंत केलेल्या सामाजिक आणि विकासात्मक कामांमुळे नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, मूलभूत सुविधा आणि परिसराचा सर्वांगीण विकास हेच या उमेदवारांच्या प्रचाराचे केंद्रबिंदू आहेत.
या चारही उमेदवारांच्या प्रचारात विकास, पारदर्शक प्रशासन आणि थेट लोकसंवाद हा समान धागा स्पष्टपणे दिसून येतो. रस्त्यांची दुरुस्ती, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, आरोग्य सुविधा, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि युवकांसाठी रोजगाराच्या संधी या मुद्द्यांवर भाजपाच्या पॅनलने ठोस भूमिका मांडली आहे. त्यामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून “विश्वासाचं पॅनल” अशी ओळख या उमेदवारांना मिळत आहे.
प्रचारादरम्यान नागरिक स्वतःहून उमेदवारांशी संवाद साधत असून, त्यांच्या समस्या आणि अपेक्षा मांडत आहेत. स्थानिक कार्यकर्ते, युवक, महिला तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने भाजपाच्या प्रचारात सहभागी होताना दिसत आहेत. जयवंत सुतार यांच्या चॅनलद्वारे उमेदवारांच्या कार्याचा आणि विकासकामांचा प्रभावी प्रचार केला जात असून त्याचाही मोठा फायदा भाजपाच्या पॅनलला मिळत आहे.
भाजपाने प्रभाग क्रमांक २१ मधील नागरिकांना आवाहन केले आहे की, भाजप उमेदवारांच्या नावासमोरील ‘कमळ’ या चिन्हासमोरील बटन दाबून सर्व चारही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा.
मतदान गुरुवार, दि. १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायं. ५.३० या वेळेत होणार असून, प्रभाग क्रमांक २१ च्या विकासासाठी नागरिक मोठ्या संख्येने मतदान करतील, असा विश्वास भाजपाने व्यक्त केला आहे.

