मधुकर ठाकूरांच्या नातवाकडून अनाथ पार्थ पाटीलला मदतीचा हात… शिक्षणासाठी साठविलेला 20 हजार रूपयांचा पॉकेटमनी केला सुपूर्द…

0
17

रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

अलिबाग तालुक्यातील नवेदर बेली या गावातील एका पती-पत्नीचा अलिबाग मांडवा रोडवरील माने फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. यानंतर त्यांचा एकुलता एक मुलगा असलेला पार्थ पाटीलच्या डोक्यावरचं मातृ-पितृ छत्र हरपल्यानंतर पार्थ पाटीलवर मोठ आभाळ कोसळल. यानंतर एकटा पडलेल्या पार्थ पाटील याच्या मदतीसाठी अलिबाग मुरुड मतदार संघाचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे सुपुत्र राजाभाऊ ठाकूर आणि त्यांचे नातू  सम्राट ठाकूर धावून आले. पार्थ पाटील याला मोठी आर्थिक मदत करून ठाकूर पिता पुत्रांनी पार्थच्या अडचणीच्या प्रसंगी त्याला मोठा आधार दिला आहे. राजाभाऊ ठाकूर यांचे सुपुत्र हे सुद्धा 12 वी मध्ये शालेय शिक्षण घेत आहेत . मात्र माझ्याच वयाचा मुलावर जेव्हा अशी वेळ आली आहे हे समजताच सम्राट ने देखील त्याची वर्षभरातील साठविलेली पॉकेट मणी पार्थ याला सहज मदतीसाठी पुढे केली आहे. तर राजाभाऊ ठाकूर यांनीही एक लाखाचा धनादेश पार्थच्या हाती देत सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा वारसा जपला.