नवी मुंबई प्रभाग २५ मध्ये ठाकरे ब्रँड चालणार; लोकांचा पाठिंबा, सर्वसामान्य घरातील उमेदवार मैदानात…

0
2

नेरुळ शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):- 

संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पैशांचा जोरदार वापर सुरू असताना, नवी मुंबईतील प्रभाग क्रमांक २५ मध्ये मात्र एक वेगळंच आणि आशादायक चित्र पाहायला मिळत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या या प्रभागात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले तीन नवखे उमेदवार मैदानात उतरले आहेत. ठाकरे विचारधारेतून उमेदवारी देण्यात आलेले हे तीन चेहरे म्हणजे चेतन कराळे, उमेश गायकवाड आणि श्रद्धा खानसोले.

यामध्ये चेतन कराळे आणि उमेश गायकवाड हे मनसे गटाचे उमेदवार असून, श्रद्धा खानसोले या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात जिथे पैसा, ताकद आणि प्रस्थापित राजकारणाचा प्रभाव दिसतो, तिथे या तीन नवख्या तरुणांना संधी देण्यात आली आहे. कोणताही राजकीय वारसा नाही, फक्त लोकांचे प्रश्न आणि स्थानिक विकासाचा अजेंडा घेऊन हे उमेदवार आज प्रस्थापित नेत्यांना थेट आव्हान देत आहेत. नवी मुंबई प्रभाग क्रमांक २५ मधून महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवं आणि वेगळं चित्र उभं राहत असल्याचं दिसत आहे.