मुंबई शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):-
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या १२ वी (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र) परीक्षेचा निकाल ५ मे २०२५ रोजी जाहीर केला जाणार आहे. हा निकाल दुपारी १ वाजता ऑनलाईनद्वारे जाहीर केला जाणार आहे. आपल्याला हा निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे…
अनेक दिवसांपासून विविध तारखा समोर येत होत्या. मात्र, बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी बारावीचा निकाल ५ मे २०२५ रोजी जाहीर होणार असल्याची माहिती दिली. हा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असेल. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपला सीट नंबर तयार ठेवावा.
कुठल्या वेबसाईटवर निकाल पाहू शकणार विद्यार्थी
http://hscresult.mkcl.org , http://hscresult.mkcl.org, mahahssboard.in,Results.targetpublications.org,Results.navneet.com