नेरळ शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके):-
रायगड जिल्ह्यात मंगळवारी ६ मे रोजी संध्यकाळपासूनच अवकाळी पावसाने हजेरी लावली असून दुपारपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते…त्यानंतर संध्यकाळच्या सुमारास कर्जत तालुक्यात पावसाने शिरकाव केला असून तालुक्यातील बऱ्याचशा भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस दाखल झाला…अवकाळी पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली असून नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे…अवकाळी पाऊस दाखल झाल्यामुळे शेतकरी आणि व्यासायिकांची धांदल उडाली असून झाडांसह पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे…वादळी वाऱ्यांमुळे कर्जत तालुक्यात गुलमोहरचे झाड कोसळल्याने शाळेचे देखील नुकसान झाले आहे…त्यामध्ये बाथरूम व किचन शेडचे पत्रे तुटून शाळेचे मोठे नुकसान झाले आहे.रात्रीची वेळ असल्यामुळे कोणतीही दुखापत झाली नाही…शासनाने नागरिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी केली जात आहे..