६१९ बालहृदयांना नवजीवन खारघरमध्ये मोफत शस्त्रक्रियांचा विक्रम… १० कोटींच्या निधीतून ६१९ बालरुग्णांची हृदयशस्त्रक्रिया यशस्वी…

0
5

नवी मुंबई शिवसत्ता टाइम्स (दीपक कांबळे):-

श्री सत्य साई संजीवनी सेंटर फॉर चाइल्ड हार्ट केअर येथे जन्मजात हृदयविकाराने त्रस्त ६१९ बालरुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करून त्यांना नवे आयुष्य देण्यात आले. रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टच्या ‘गिफ्ट ऑफ लाईफ’ प्रकल्पांतर्गत, प्रकल्पाध्यक्ष पीपी नितीन मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली १० कोटी रुपयांचा निधी उभारून या शस्त्रक्रिया पार पडल्या. या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी, भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी बालरुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन संवाद साधला. गावस्कर म्हणाले, “या धाडसी मुलांचे धैर्य आणि रुग्णालय व रोटरी क्लबचे निःस्वार्थ कार्य प्रेरणादायी आहे. वेळीच उपचाराने अमूल्य जीवन वाचू शकते.” डॉ. प्रभात रश्मी (वरिष्ठ सल्लागार, बालरोग हृदयरोग शस्त्रक्रिया विभाग) यांनी सांगितले की, जन्मजात हृदयविकारात हृदयातील छिद्र, झडपांचे विकार किंवा रक्तवाहिन्यांतील असामान्यता असू शकते. वेळेवर उपचार न मिळाल्यास दम लागणे, वाढ खुंटणे, संसर्ग किंवा मृत्यूचा धोका वाढतो. लवकर निदान आणि शस्त्रक्रियेमुळे मुलांना निरोगी, सक्रिय जीवन मिळू शकते. दरवर्षी भारतात २ लाखांहून अधिक मुले जन्मजात हृदयविकारासह जन्मतात, त्यापैकी सुमारे ७०,००० मुलांना पहिल्या वर्षातच शस्त्रक्रियेची गरज भासते. मात्र आर्थिक अडचणी व जागरूकतेअभावी अनेकांना उपचार मिळत नाहीत.पीपी नितीन मेहता म्हणाले, “प्रत्येक मुलाला निरोगी हृदयाची संधी मिळायलाच हवी. हे दान नसून मानवतेचे सर्वोत्तम उदाहरण आहे.