विहिरींमध्ये एका व्यक्तीने चक्क विष टाकल्याचा संशय… मुलीचे प्रेम तोडण्यासाठी भोंदूबाबाचा घेतला आधार…   

0
13

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-

           अलिबाग तालुक्यातील सालाव आणि ताडगाव गावातील विहिरींमध्ये एका भोंदू बाबाने केलेला प्रताप उघड झाला आहे… एका मुलीला तिच्या प्रियकरापासून अलिप्त करण्यासाठी भोंदूबाबबाने मुलीच्या वडिलांना एक नवीन युक्ती दिली होती. या युक्तीचा वापर करण्यासाठी गेलेल्या त्या व्यक्तीला गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडले आहे. मुलाच्या प्रेमापासून मुलीला अलिप्त करण्यासाठी भोंदू बाबाने मंतरलेली जडी बुटी मुलीच्या वडीलांकडून थेट गावच्या विहिरीत टाकण्याचा प्रकार उघड झाला आहे.  ज्या विहिरीत ही जडीबुटी टाकली त्या विहिरीचे पाणी पिण्यास या व्यक्तीने नकार दिल्याने या गावकऱ्यांना विहिरीत विष टाकल्याचा संशय आला. यानंतर या गावकऱ्यांनी रेवदंडा पोलिस स्टेशन गाठत संपूर्ण घडलेला प्रकार सांगितल्यानंतर पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. उर्वरित तपास येथील पोलिस करत आहेत. गावकऱ्यांनी रेवदंडा पोलिस ठाण्यात एकच गर्दी करुन या घटनेसंदर्भात संताप व्यक्त केला आहे.आपल्या मुलीला प्रियकरापासून अलिप्त करण्यासाठी भोंदूबाबाने मुलीच्या वडिलांना सांगितलेला प्रकार उघड झाल्यानंतर नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. भोंदू बाबाने मंतरलली जडी बुटी मुलीच्या वडीलांकडून थेट गावच्या विहिरीत टाकण्याचा प्रकार केला होता. मात्र, ही गोष्ट गावकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी थेट पोलिस स्टेशन गाठले आहे.गावकऱ्यांनी घडलेला सगळा प्रकार रेवदंडा पोलिस स्टेशन गाठत सांगितला आहे. त्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तिला ताब्यात घेऊन चौकशी देखील सुरु केली आहे… दरम्यान,असा चुकीचा प्रकार घडल्याने हावकरी संताप व्यक्त करताना दिसत आहे…