रोहा नगरपालिका ॲक्शन मोडवर …नगरपालिकेची अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई…

0
10

रोहा शिवसत्ता टाइम्स (दीप वायडेकर ) :-

रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात,रोहा नगरपालिका आज ॲक्शन मोडवर पाहायला मिळाली. अनेक दिवसांपासून होणाऱ्या सोशल मीडियावर  ,अपघात ,रस्त्याची वाहतूक कोंडी या समस्या लक्षात घेता. खासदार तटकरे यांनी रोहा मुख्याधिकारी यांना योग्य ते नियोजन करून सक्त कारवाई करायचे आदेश दिले होते. त्याची आज प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली पाहायला मिळाली.रोहा पोलीस स्टेशन, रोहा वाहतूक पोलीस यांच्या साह्याने नगरपालिकेने रस्त्यावर असलेल्या अनधिकृत टपऱ्या गाड्या ,तसेच व्यापारांच्या अनधिकृत वाढीव बांधकामावर आज अखेर सक्त कारवाई करून फावडा फिरवलेला पाहायला मिळाला. यामुळे रोह्यातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. रोह्यातील मुख्य रस्ता मोकळा झाल्यामुळे याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. तसेच अनेक समस्यांना पूर्णविराम मिळणार आहे. यामुळे रोहेकर नागरिकांकडून रोहा नगरपालिकेला कौतुकाची थाप मिळून सार्वत्रिक रित्या कौतुक होत आहे….