रोहा तालुक्यात ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का… शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश…

0
2

रोहा शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):- 

ऐन निवडणुकीच्या काळात रोहा तालुक्यातील नागोठणे जिल्हा परिषद मतदारसंघात व ऐंनघर विभागातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला मोठा धक्का बसलाय… मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत रोहा तालुका उपाध्यक्ष मनोज खांडेकर व सुमित काते यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केलाय. या पक्ष प्रवेशाने शिवसेनेला मोठी बळकटी मिळाली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचा फायदा होणार असल्याचे मंत्री गोगावले यांनी सांगितले…