किल्ले रायगडावर साजरा होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी मंत्री भरतशेठ गोगावले यांनी घेतली आढावा बैठक…

0
14

महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-

9 जून रोजी किल्ले रायगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे… शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या नियोजनाच्या अनुशंघाने मंत्री भरतशेठ गोगावले यांनी आढावा बैठक घेत शासन आणि आयोजकांकडून उत्सवाच्या आयोजनाबाबत माहिती घेतली…येणारे मान्यवर आणि शिवभक्त यांची गैरसोय होणार नाही याबाबत शासकिय अधिकारी आणि आयोजकांना सूचना केल्या…शिवराज्याभिषेक सोहळ्याता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण दिल असून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निमंत्रण देणार असल्याचे गोगावले यांनी सांगितले आहे…