बेदरकार वेगाचा बळी… मोटारसायकल घसरून चालकाचा जागीच मृत्यू… एक जखमी

0
14

माणगाव शिवसत्ता टाइम्स  (नरेश पाटील) :- 

दि. १६ मे २०२५, सव्वानऊ च्या सुमारास माणगाव कुंभाळे मार्गावरील गाव बस-स्टॉपजवळ अतिवेगात असलेली होन्डा लिओ (MH-06-BQ-1432) मोटारसायकल रस्त्यात अचानक आलेल्या कुत्र्यामुळे घसरून अपघात झाला…. या दुर्घटनेत संतोष लक्ष्मण लमाणी (४०, रा. आदळेताडा, जि. गदग – सध्या चोडशेत, ता. माणगाव) यांचा जागीच मृत्यू झाला… तर मागे बसलेला त्यांचा नातेवाईक किरकोळ जखमी झाला आहे…. प्राथमिक तपासानुसार, मोटारसायकलचा अतिवेग व बेदरकारपणे चालवली जात असताना चालकाने कुत्रा टाळण्यासाठी जोरात ब्रेक दाबला… त्यामुळे वाहन नियंत्रण सुटून रस्त्यावर आदळले…. संतोष लमाणी यांच्या डोक्याला, छातीत व हात-पायांना गंभीर मार लागल्याने घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला…. सदर अपघाताबाबत अशोक लछाप्पा लमाणी यांनी माणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, गुन्हा रजिस्टर क्रमांक १०१/२०२५ नुसार भा.दं.वि. कलम १०६ (१), २८१, १२५(अ) (ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत नोंद करण्यात आली आहे…. सदर अपघाताचा पुढील तपास पोसई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे….