रोह्यात स्वच्छता मोहिमेवरून राजकारण तापले;भाजपचा पलटवार… लोकशाही आहे,लोकशाहीमध्ये कोण कोणाला अडवू शकत नाही…

0
11

रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):- 

रोहा शहरातील स्वच्छता मोहिमेबाबत सध्या राजकीय वातावरण तापलेले असून,यावर भाजपने पलटवार करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.भाजप रोहा तालुका अध्यक्ष अमित घाग यांनी स्पष्टपणे सांगितले की, “प्रभाग कोणाची मक्तेदारी नाही आहे. ज्या ठिकाणी नागरिकांच्या समस्या आहेत, त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते तत्परतेने मदत करतील.”

घाग पुढे म्हणाले, “आम्ही फक्त एखाद्या एक-दोन प्रभागांपुरते मर्यादित नाही, तर संपूर्ण रोहा शहर व तालुक्यात आम्ही जोमाने काम करतो आणि पुढेही करत राहणार आहोत.” त्यांच्या या वक्तव्याने भाजपचा कार्यक्षेत्र विस्तार आणि जनसंपर्कावर भर असल्याचे स्पष्ट होते.

लोकशाही आहे, आणि लोकशाहीमध्ये कोण कोणाला अडवू शकत नाही,” असे सांगून त्यांनी विरोधकांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. रोहामध्ये सध्या चालू असलेल्या स्वच्छता मोहिमेवरून सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून हे पहिले अधिकृत उत्तर असल्याचे बोलले जात आहे.