भर पावसात रोहा शहरातील नगरपालिकेसमोर डांबरीकरणाचे काम सुरु… पावसात ठेकेदाराकडून चुना… स्थानिक नागरिक संतप्त…

0
12

रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):-  

रायगड जिल्ह्यातील रोहे शहरातील नगरपालिका समोरील साई मल्हार चौक ते धनगर आळी ते वीर सावरकर रोडच्या डांबरीकरणाचे काम भर पावसात करण्यात आले आहे… त्यामुळे पावसात डांबर टिकत नसल्याने रस्ता उखडला गेला आहे… त्यामुळे स्थानिक नागरिक संतप्त झाले असून ठेकेदाराने सदर रस्त्याला चुना लावल्याचे बोलले जात आहे…

सदर रस्त्याला फेब्रुवारी महिन्यात मंजुरी मिळाली होती… परंतु ठेकेदाराच्या आडमुठेपणामुळे हा रस्ता रखडला होता सदर रस्ता हा रोहे शहरातील मुख्य रस्ता आहे… या रस्त्याला नागरिकांची वर्दळ असते तसेच धनगर आळीची वस्ती या रस्त्याला येत असल्याने तटकरेंचे डावे उजवे सुद्धा या ठिकाणी राहतात… मात्र ते निकृष्ट विकासाबाबत काही बोलू शकत नाही… भर पावसात डांबर टाकल्याने रस्त्याचे खूप नुकसान झाले असून रस्त्याची पूर्वी होती तशी परिस्थिती होणार आहे…

काहीच दिवसांपूर्वी रोहे शहरातील विकास कामांची पाहणी खासदार सुनील तटकरे यांनी केली होती मात्र सदर रस्ता हा खासदार सुनील तटकरे यांना दिसला नाही का असे जनतेतून बोले जात आहे… ज्या ठेकेदाराला काम दिले आहे तो ठेकेदार नियम अटी शर्तीत बसत नाही मग त्याला काम कसे दिले गेले हा मुद्दा उपस्थित झाला आहे…

रोहे शहरात विकासाची कामे ही जनतेसाठी  व मतदारासाठी होत आहेत की ठेकेदार व पुढारी यांच्यासाठी होत आहेत… अशी चर्चा सध्या सुरु आहे… याबाबत स्थानिक कार्यकर्ते प्रकाश कोळी यांनी या रस्त्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली व ठेकेदाराची व अधिकार्‍याची चौकशी व्हावी अशी मागणी खासदार सुनील तटकरे यांच्याकडे केली आहे…