खालापूर पोलिसांनी ८० म्हशी टोल नाक्यावर पकडल्या… कत्तलीसाठी देवनार येथे घेऊन जात असल्याची माहिती प्राप्त…  

0
26

चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):-  

कोल्हापूर येथून चार टेम्पोमधून ८० म्हशी मुंबई येथे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची खबर खालापूर पोलिसांना मिळाली,पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी तात्काळ खालापूर टोल नाक्यावर हे चार टेम्पो पकडले.

ईद सण जवळ आला असून ईद साजरी करण्यासाठी जातीय सलोखा व पोषक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असताना आज मुंबई देवनार येथे कत्तली साठी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणांगले येथील वडगाव बाजारातून चार टेम्पोमधून ८० म्हशी जात असल्याची पक्की खबर पोलिसांना मिळाली, पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी तात्काळ खालापूर टोल नाक्यावर बंदोबस्त तैनात केला असता  टेम्पो क्रमांक MH-02-FG-5162, टेम्पो क्रमांक MH-47-BL-5451, टेम्पो क्रमांक MH-03-CP-2327 व टेम्पो क्रमांक MH-03-EG-5947 या चार टेम्पोत ८० म्हशी आढळल्या. चारही टेम्पोचा आरटीओ व पशुवैद्यकीय अधिकारी यांचेकडील कोणताही वाहतुक परवाना नाही. प्रत्येक टेम्पोमध्ये २० म्हैशी याप्रमाणे भरून या म्हैशींना हवा, पाणी, चारा यांची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही.अत्यंत दाटीवाटीने म्हशी भरल्याचे दिसून येत होते.त्यामुळे करीम कलीम कुरेशी, वय २८ वर्षे, रा. गोवंडी, शिवाजीनगर, लोटस कॉलनी मुंबई, २) हिदायत शहदाय अब्बास सय्यद वय ४८ वर्षे रा. गोवंडी मुंबई ३) फरान आस्लम आलवी, वय ३० वर्षे, रा.गोवंडी, शिवाजीनगर लोटस कॉलनी मुंबई ४) रेहान आस्लम आलवी, वय २४ वर्षे, रा. गोवंडी मुंबई ५) प्रताप भिका चव्हाण, वय ६० वर्षे, रा. गोवंडी टाटानगर, ६) बबन बाळाराम कांबळे, वय ६० वर्षे, रा. सावरडे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापुर ७) रमजान छेटू खान, वय ५१ वर्षे, रा. टाटानगर गोवंडी मुंबई यांचे विरूद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६० चे कलम ११ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११९ प्रमाणे पोलीस हवालदार चंद्रकांत पेर यांनी कायदेशीर फिर्याद खालापूर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी खालापूर तालुक्यात ईद सण साजरा करण्यासाठी जातीय सलोखा आणि पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी हिंदू संघटना व मोहल्ला कमिटी यांच्या स्वतंत्र बैठका आयोजित केल्या होत्या…पण तालुका बाहेरील अशा घटनांनी वातावरण बिघडू नये, अशीच येथील जनतेची अपेक्षा आहे.