अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
पावसाळी वातावरणाचा आनंद घेण्यासाठी माथेरानमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होत आहेत.मात्र,त्यामुळे येथील रेल्वे तिकीट केंद्रावर अनियमित गर्दी निर्माण झाली असून, तिकीट घेण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या प्रवाशांमध्ये धक्काबुक्की आणि किरकोळ वाद-विवाद होण्याच्या घटना घडत आहेत. विशेषतः सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची संख्या वाढते.तिकीट खरेदीसाठी लावण्यात येणाऱ्या रांगा अपुऱ्या पडत असून, यामुळे शिस्तीचा अभाव निर्माण होतो. रांगेतील गोंधळामुळे काही वेळा प्रवासी एकमेकांवर ओरडत, ढकलत असल्याचे पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी मारामारीसारखी परिस्थितीही निर्माण होत असल्याचं प्रत्यक्षदर्शीनी सांगितलं. अशीच घटना माथेरानमध्ये घडली आहे…माथेरानमध्ये रेल्वे तिकीटच्या लाईनवरून धक्काबुक्की झालेली पाहायला मिळत आहे…तिकीट लाईन काढत असताना धक्काबुक्की झाली आहे…धक्काबुकी झाल्याने दोन गटात तुफान मारामारी झाली…याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे…
स्थानिक प्रशासन आणि रेल्वे व्यवस्थापनाने या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तिकीट व्यवस्थापनात सुधारणा करणे, अधिक कर्मचाऱ्यांची नेमणूक आणि योग्य नियोजनाची आवश्यकता असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.