अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
भारतीय जनता पार्टीच्यावतीने अलिबाग येथे काल पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी निमित्त भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.या मेळाव्याला स्थानिक महिला वर्गाकडून उत्स्फूर्त आणि प्रचंड प्रतिसाद लाभला…या उपक्रमाच्या माध्यमातून अहिल्यादेवींच्या प्रेरणादायी कार्याची,त्यांच्या कुशल प्रशासकीय नेतृत्वाची आणि त्यागमय जीवनाच्या वारशाची उजळणी करण्यात आली.समाजहितासाठी त्यांनी केलेले कार्य आजही मार्गदर्शक ठरत असून,अशा महान स्त्रीशक्तीचा गौरव करण्यात भारतीय जनता पार्टीला अभिमान वाटतो…मेळाव्यातून अहिल्यादेवींचे विचार आणि मूल्ये नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला.
या कार्यक्रमाला भाजप महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आमदार श्री. विक्रांतजी पाटील, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष खासदार श्री. धैर्यशील दादा पाटील, माजी आमदार श्री. पंडितशेठ पाटील, श्री. आस्वादजी पाटील, सौ. भावनाताई पाटील, श्री. सतीशजी धारप, श्री. महेश मोहिते, श्री. वैकुंठशेठ पाटील, सौ. प्रियदर्शनी पाटील, सौ गीताताई पालरेचा महिला मोर्चा अध्यक्षा सौ. मंजुषा कुद्रेमोती, सौ. हेमा मानकर, सौ. वैशाली मापारा, सौ. यशोधरा गोडबोले तसेच अन्य अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. या प्रेरणादायी कार्यक्रमामुळे महिलांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, अशा उपक्रमांच्या माध्यमातून भाजप महिला सक्षमीकरणासाठी कटिबद्ध असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले.